सेलू ( प्रतिनिधी ) गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे राहते घरी गोवंश जणावराचे मांस स्वतःचे ताब्यात बाळगुन त्याची अवैद्धपणे विक्की करीत असतांना सेलू पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी शेख मैदु शेख चांदसाहब, वय 79 वर्षे, व्यवसाय खाटीक याने 04/05/2026 रोजी सकाळी 10.30 वा. कुरेशी मोहल्ला सेलू येथे आरोपीने कोठेतरी गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे राहते घरी गोवंश जणावराचे मांस स्वतःचे ताब्यात बाळगुन त्याची अवैद्धपणे विक्री करीत असतांना मिळुन आल्याने सेलू पोलीस ठाण्यात गुरनं 232/2026 कलम 5 (सी), 6, 9 (ए) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम 1976 नुसार सोपान बाबुराव बारवक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी कडून 2500/-रु. एका भगव्या रंगाचे प्लॅस्टीकचे टोपली ज्यात हाडे मिश्रीत गोवंश मांस अंदाजे 10 किलो प्रती
किलो 250/- रु किलो प्रमाणे.
2) 00.00/-रु.- मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे 4 सु-या जु.वा.किं.अं.
3 ) 00.00/-रु.- एक हाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी कु-हाड ज्यास लाकडी दांडा असलेली जु.वा.किं.अं.
4) 500/-रु. चार नग लोखंडी वजनी माप 01 कि.ग्रॅ. तसेच 500 ग्रॅम, 200 ग्रॅम व 50 ग्रॅम असे असलेले जु.वा.किं.अं.असा एकुण 3000/-रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. सूर्यवंशी करत आहेत.