आपला जिल्हा
जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवंतांची खान… मा. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर.
पीएम. श्री. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव 2026 उत्साहात साजरा.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील डासाळा येथील पीएम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव 2026 जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मा.ना. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. 15 जून रोजी साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय रोडगे, डॉ. आशिष डख, पंचायत समिती सभापती श्री. गजानन डोंबे, सदस्य श्री. शिवराम कदम, ॲड .दत्तराव कदम, शिक्षणाधिकारी श्री. संजय ससाणे, गटविकास अधिकारी श्री. उदय जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री. गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख श्री. गजानन भिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात आले.
वर्ग पहिलीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे मंत्रिमहोदयांच्या हस्ते करण्यात आलेले औक्षण पाहून विद्यार्थी व पालक भारावून गेले. यावेळी शाळेतील पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांच्या पावलांचा घेण्यात आलेला ठसा कौतुकाचा विषय ठरला.




