आपला जिल्हा
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला सेलू तालुक्यातून तीव्र विरोध
मोर्च्याद्वारे निषेध नोंदवत मूख्यमंत्र्यांना निवेदन

सेलू( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अनंत बदर समिती’च्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी तालुक्यातील समस्त आंबेडकरी, संविधानप्रेमी नागरिक,सामाजिक संघटना आणि अनुसूचित जातीतील बांधवांच्या वतीने मोर्च्याच्यामाध्यमातून निषेध नोंदवत उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे सोमवार १५ जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.





