आपला जिल्हा

फसव्या कर्जमुक्तीच्या आदेशाची किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी केली होळी

तहसीलदार यांना दिले निवेदन

सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील तहसील कार्यालयासमोर गुरुवार ११ जुन २०२६ रोजी शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात फसव्या शासन आदेशाची किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी केली होळी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमुक्ती बाबतीत सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिले होते.त्या आश्वासनांची पूर्तता करावी यासाठी २८ /२९ अक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे जबलपूर महामार्ग रोखून हजारो शेतकऱ्यांनी महामुक्काम आंदोलन किसान सभेचे शेतकरी नेते कॉम्रेड डॉ अजित नवले, राजू शेट्टी,रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने त्यावेळी ३०जुन २०२६ च्या पुर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती.प्रत्यक्षात २जुन २०२६ रोजी शासन आदेशानुसार लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीतून वगळण्याचे कारस्थान रचले गेले आहे. याचा किसान सभेचे शेतकरी नेते कॉम्रेड डॉ अजित नवले व किसान सभेने पहिल्या दिवसापासून निषेध करत राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याचे आवाहन केले होते. आज गुरुवार ११ जुन रोजी संपुर्ण महाराष्ट्रात या फसव्या शासन आदेशाची होळी करण्याचे आंदोलन किसान सभेच्या वतीने करण्यात आले. सेलू येथे ही तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी फसव्या शासन आदेशाचा धिक्कार असोअटीशर्थी शिवाय २०१२पासून चे सरसकट शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, २ जुन चा जि आर मागे घ्या, फडणवीस सरकार होश में आयो, संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे अदी घोषणा देण्यात आल्या.यावेळी र्कॉम्रेड रामेश्वर पौळ सह शेतकऱ्यांनी शासन आदेशाची होळी करून नायब तहसीलदार गजानन इनामदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तु सिंग ठाकुर, उद्धव पौळ, सुभाष शहाणे, रोहीदास हातकडके, बाळू पौळ, रंगनाथ ताठे, शिवाजी पौळ, गणपत गोंडगे, शांतीराम पौळ, धोंडीराम पातळे, नारायण पवार,भगवान वाव्हळ, पंडीत आवटे, सचीन गाडेकर राजेभाऊ पौळ,दत्ता बादाड सह अनेक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!