सेलू ( प्रतिनिधी ) : येथील श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील ‘भक्तितीर्थ’, साई मंदिर, महेश नगर येथे कथा प्रवक्ता, वेद शास्त्र संपन्न हरि भक्त परायण श्रीपद्मनाभमहाराज व्यास (धाराशीव ) यांच्या प्रासादिक वाणीतून १३ जून ते १८ जून या कालावधीत दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन केले आहे. कथा समाप्ती शुक्रवार दि. १९ जून रोजी होणार असून सकाळी ७.३० वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज मंदिर ते कथा स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. तद्नंतर सकाळी नऊ ते बारा कथेचा समारोप होईल. श्रीमद् भगवद्गागवत कथेस उपस्थित रहावे असे आवाहन वसुधा मनोहर कुलकर्णी, मीना व शशिकांत कुलकर्णी, सुनंदा व शरद कुलकर्णी, वैशाली व राहुल कुलकर्णी, दिप्ती व अतुल कुलकर्णी, इशिता कुलकर्णी, शाश्वत कुलकर्णी यांनी केले आहे.