आपला जिल्हा

अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा

सेलू ( प्रतिनिधी ) श्रीरामजी भांगडीया यांच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त नूतन महाविद्यालयाच्या वतीने दि.10/06/2026 (बुधवार) रोजी दुपारी 4.00 वा ‘अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पेरणी व पेरणीनंतर घ्यावयाची काळजी’ या विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यकर्मासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. एस. एम. लोया (अध्यक्ष नू.वि.शि.सं. सेलू)

उद्घाटक डॉ. अरविंद पंडागळे, संशोधक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख मार्गदर्शक
श्री मंगेश देशमुख, प्रगतशील शेतकरी, पेडगाव ता. जि. परभणी. डॉ. गजानन दादाराव गडदे,संशोधक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

कार्यकर्मासाठी प्रमुख उपस्थिती डॉ. व्ही. के. कोठेकर (सचिव, नूतन विद्यालय शिक्षण संस्था)
श्री जयप्रकाशजी बिहाणी (सहसचिव, नूतन विद्यालय शिक्षण संस्था) उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्तरावजी पावडे (संयोजक, शेतकरी मेळावा) डॉ. शरद कुलकर्णी (संयोजक, श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयती वर्ष) डॉ. उत्तम राठोड (प्राचार्य, नू.म. सेलू) डॉ. पी. आर. कंठाळे (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, नू.म. सेलू) यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!