आपला जिल्हा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक निवडणुकीत 3 उमेदवार निवडणूक रिंगणात…4 उमेदवारांचे अर्ज मागे

परभणी, 4 (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुक-2026 साठी एकूण 3 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. तर 4 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव व पक्ष पुढील प्रमाणे आहेत. विवेक पांडुरंग नावंदर, पक्ष-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), सईद खान शेरगुल खान, पक्ष – शिवसेना आणि सुशिलकुमार सुरेशराव देशमुख (अपक्ष).

उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांचे नावे पुढील प्रमाणे आहेत. संग्राम प्रतापराव जामकर, बुधवंत विश्वजित मनोहर, मेहराज खान शेरगुल खान पठाण आणि विजय रावसाहेब जामकर. सर्व उमेदवार अपक्ष आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!