आपला जिल्हा

ठेकेदाराकडून होणारा पाणी उपसा तात्काळ थांबवण्याची मागणी –मोरेगाव बंधाऱ्यातील प्रकार

सेलू दि ०२( प्रतिनिधी )सध्या भर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असतांना मोरेगांव येयील दुधना नदीवरील बंधा-यातून बेसुमारपणे पाण्याचा उपसा संबंधित ठेकेदार करीत आहे. जे पुर्णपणे बेकायदेशीर आहे.

या वर्षीचा तीव्र उन्हाळा व नैसर्गिक आपत्तीमुळे जर पावसाळा उशीरा आला तर त्यामुळे या परिसरात तीव्र पाणी टंचाई तसेच जनावरांना देखील पाणी पिण्याची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे सदर होणारा पाणी उपसा तात्काळ बंद करण्यात यावा व यापूढे पाऊस पडेपर्यंत पाणी उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी सेलू दबाव गटाच्या वतीने आज दि ०२ जून (मंगळवारी) उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक अॅड श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, मुकुंद टेकाळे, सतिश काकडे, ऍड. देवराव दळवे, महादेव लोंढे, सुभाष काकडे, आबासाहेब भुजबळ, अँड योगेश सूर्यवंशी, राजेंद्र केवारे,गुलाबराव पौळ,उध्दवराव सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!