सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील मंजित कॉटन जिनींग येथील सोलारची वायर चोरी प्रकरणी सेलू पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश जिवनलाल टेंभरे वय 45 वर्षे जिनिंग मॅनेजर, मंजीत कॉटन प्रा.लि. सेलू दि 20.मार्च .2026 रोजी पोस्टे सेलू येथे फिर्याद दिली दि: 18.मार्च .2026 रोजी सायंकाळी 07.30 वा. ते दि. 19.मार्च .2026 रोजी सकाळी 11.30 वा.सु. सेलू शिवारातील गटक्र 196 मधील मंजीत कॉटन प्रा. लि. या कंपनीचे कंम्पाउंडचे आतमध्ये उघडया जागेवर बसवलेले सोलार प्लान्टचे तांब्याचे वायर अज्ञात चोरट्याने कम्पाउंडचे भिंतीला भगदाड पाडुन आतमध्ये प्रवेश करून सोलार प्लान्टचे तांब्याचे केबल वायर 4 mm साईजचे अंदाजे 1800 मीटर वायरची चोरी झाली होती.
अर्जुन रजनी चव्हाण वय 19 वर्षे 2. अनिल बाबुराव काळे 3. प्रकाश बाबा चव्हाण 4. अजय परशुराम पवार सर्व रा. पारधीवाडा परतुर ता. परतुर जि. जालना 5. रियाज ऊर्फ दुर्लभ फेरोज पठाण रा. पंचतन नगर परतुर ता. परतुर जि. जालना सदरील आरोपी पैकी अर्जुन रजनी चव्हाण यास अटक करण्यात आली. आरोपी कडून नगदी 50000 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीस नायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांच्या मार्गदरर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के एस तेलंग करत आहेत.