सेलू, ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात एल.के.आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेलूने राज्यस्तरावर अभूतपूर्व यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. राज्यातील CBSE, CISCE/ISC शाळांमधून प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच सहावा राज्य गुणवत्ता क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राज्य गुणवत्ता यादीत समर्थ अनंत तेलभरे यांनी राज्य प्रथम, तेजश्री महेश कुमार चौधरी यांनी राज्य द्वितीय, सृष्टी गोविंद कदम यांनी राज्य तृतीय, तर समर्थ श्याम मचाले यांनी राज्य सहावा क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता पाचवीच्या गटात चंद्रशेखर गायकवाड यांनी राज्य दहावा, तर समर्थ सुरवसे यांनी राज्य पंधरावा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात आणखी भर घातली.
विशेष म्हणजे, या परीक्षेत शाळेचे एकूण २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, ही कामगिरी शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक नियोजनाचे द्योतक मानली जात आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
श्रीराम प्रतिष्ठान सेलू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, सदस्य डॉ. आदित्य रोडगे, मुख्याध्यापक मीरा मिरिंडा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
_*यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे म्हणाले, “हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही, तर पालकांचा विश्वास, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयाचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. भविष्यातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला सक्षम नेतृत्व देण्याचा आमचा संकल्प आहे.”