आपला जिल्हा

सेलूत विविध परीक्षेतील गुणवंत आणि खेळाडूंचा होणार गौरव

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८७ वा वर्धापनदिन आणि दलित मित्र श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिन तसेच श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती वर्षाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.०३ ) रोजी दुपारी ३:३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या घटक संस्थांतील विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया हे असणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सत्यनारायणजी सोमाणी लाभणार असून, सेलू येथील डॉ.मनीषा घांडगे-डोंबे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. नूतन कन्या प्रशाला परिसरातील‌ कै.सौ.कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, नागरिक,पालक आणि शिक्षणप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी आणि कार्यकारी मंडळाने केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!