सेलू तालुक्यातील सिंगल फेज लाईन तात्काळ सुरु करा
अभियंता, महावितरण कार्यालय सेलू यांना निवेदन

सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागासाठी संध्याकाळचे वेळेस सिंगल फेज लाईन सुरू करण्याबाबत मागील वर्षी निर्णय केला आहे त्यानुसार तालुक्यातील काही सर्कल मध्ये सिंगल फेज लाईन सुरू आहे मात्र 2025 चे ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने मागणी करूनही आपल्या कार्यालयाचे चिखलठाणा सर्कलमधील खेड्यामध्ये अद्याप सिंगल फेज लाईन सुरु करण्यात आलेली नाही. आपल्या कार्यालयाकडे नाहक शेतकऱ्यांचे न्याय मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
आता खरिपाच्या पेरणीचे दिवस आहेत पाऊस सुरू झाल्यावर शेतामध्ये वेळी रात्री जावे लागते तसेच शेतकरी जो शेतामध्ये आखाड्यावर राहतो. त्याची रात्रीच्या वेळेस जर सिंगल फेज लाईन सुरु झाली नाही तर या पावसाळ्यात अत्यंत अडचण निर्माण होणार आहे पावसाळ्यात शेतात सतत साप विंचू इत्यादी विषारी प्राण्यांचा वावर असतो त्यांचे पासून मानवी जीविकास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे रात्रीच्या वेळेस शेतामध्ये आखाड्यावर सिंगल फेज वीज चालू असणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच अनेक खेड्यात अद्याप मानसून पूर्व पडलेले वाकलेले वीज खांबांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोमकळत आहेत ही सर्व कामे पाऊस पडण्यापूर्वी होणे आवश्यक आहे. मात्र आपले कार्यालय याबाबत फारसे गंभीर दिसत नाही.
या आपल्या बेजबाबदारपणामुळे भविष्यात मनुष्य व जनावरांच्या जीवित धोका आणि झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आपले कार्यालयावरच राहील.
तरी आपणास निवेदन देण्यात येते की वरील प्रकरणी आपण तात्काळ सकारात्मक कार्यवाही करावी.
1) चिकलठाणा सर्कल मध्ये तात्काळ सिंगल फेज लाईन कार्यान्वित करावी संपूर्ण तालुक्यातील सिंगल फेज बंद आहेत.
2) तसेच विशेष अभियान राबवून तात्काळ तालुक्यातील ग्रामीण भागात वाकलेले वीज खांबे लोमकळलेल्या तारा तसेच पडलेले वीज खांब सरळ करून वीज पुरवठा सुरू करावा.
याबाबत आपण तात्काळ कारवाई न केल्यास दिनांक 15/07/2026 रोजी आपले कार्यालय समक्ष लाक्षणीय उपोषणाचा मार्ग अवलंब करावा लागेल.
निवेदक
ॲड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओम प्रकाश चव्हाळ, राजेंद्र केवारे, विलास रोडगे, गुलाब पौळ,आबासाहेब भुजबळ,सतीश काकडे, ॲड. देवराव दळवे,ॲड.योगेश सूर्यवंशी, उद्धव सोळंके, नारायण पवार,चंद्रकांत चौधरी, गणेश सोळंके, सुभाष काकडे,जलाल भाई, रौफ भाई, अक्षय बुरे,मुकुंद टेकाळे, दिलीप मगर,अजित मंडलिक, भारत रवंदळे,लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे,उत्तम गवारे, विकास गादेवार, दिलीप शेवाळे, प्रमोद कादे,महादेव लोंढे, दत्तराव कांगणे, लिंबाजी कलाल,सुधीर आघाव,भारत झाल्टे,तुकाराम मगर,विठ्ठल राऊत, दिगंबर मोरे, कैलास ढाले,उदय गिरी, शिवाजी चट्टे, प्रसाद मगर,धनंजय डासाळकर



