आपला जिल्हा

यशवाडी सभामंडपाचा खांब कोसळल्याने 04 जणांचा मृत्यू तर 18 जण जखमी

परभणी : ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी मारुती देवस्थान येथे आज मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. देवस्थान परिसरात सुरू असलेल्या सभामंडपाच्या बांधकामादरम्यान खांब अचानक कोसळल्याने मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. यात चार जणांचा मृत्यू व 18 जण जखमी असल्याची माहिती हती आली आहे.

शनिवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उपस्थित असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, मृत व जखमींची अधिकृत संख्या अद्याप प्रशासनाकडून जा-हीर करण्यात आलेली नाही.

 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरात अनेक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून ढिगायाखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे मानवत तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. चार जणांचा मृत्यू अनेक जण गंभीर जखमी उपचारासाठी आरपी हॉस्पिटल व सरकारी हॉस्पिटलमध्ये व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!