आपला जिल्हा

परभणी जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी धीरज सोमानी तर सचिव पदी गोकुळदासजी डाड यांची निवड

परभणी | प्रतिनिधी परभणी जिल्हा माहेश्वरी सभेच्या सत्र २०२६-२९ साठीची निवडणूक रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी बिनविरोध पार पडली. समाजाच्या संघटनात्मक कार्याला चालना देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदी श्री. धीरजजी सोमाणी (परभणी) यांची निवड झाली. जिल्हामंत्रीपदी श्री. गोकुळदासजी डाड (परभणी) यांची मनोनयनाद्वारे निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी श्री. गोविंदप्रसादजी पोरवाल (जिंतूर) आणि श्री. नंदकिशोरजी सोमाणी (गंगाखेड), अर्थमंत्रीपदी श्री. व्यंकटेशजी काबरा (सेलू), संघटन मंत्रीपदी श्री. रुपेशजी काबरा (मानवत), प्रचार मंत्रीपदी श्री. शैलेशजी काबरा (मानवत) यांची निवड झाली.
संयुक्त मंत्री म्हणून श्री. आशिषजी लोया (परभणी) आणि श्री. पवनकुमारजी मंत्री (पाथरी) यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी यांचे समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात आले असून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

परभणी जिल्हा अर्थमंत्री पदी सेलूचे वेंकटेशजी काबरा यांच्या निवडी मुळे सेलू तालुका माहेश्वरी समजा तर्फे काबरा यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी परभणी तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सुनील साबू आणि सचिव शिवप्रसाद भुतडा यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आगामी काळात समाजाच्या विकासासाठी व एकजुटीसाठी नवीन कार्यकारिणी कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!