आपला जिल्हा
सेलूत साकारतेय इन्फोटेंटमेंट पार्क – शिक्षण आणि मनोरंजनाचा अद्वितीय संगम

सेलू, ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे “PRINCE Infotainment Park” हा बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून, हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार आहे. “Ultimate Destination for Learning & Fun” या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प सन २०२६ च्या उत्तरार्धात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.




