सेलू (प्रतिनिधी ) 15 जून 2026 पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. 2026 – 27 या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील सर्व नागरिक व पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश देण्यापूर्वी संबंधीत शाळेला शासनाची मान्यता आहे किंवा नाही याची खात्री करूनच पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू च्या वतीने 10 जून 2026 रोजी च्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की सेलू तालुक्यात सध्यपरिस्थितीत विनापरवानगी अथवा अनधिकृत पणे कार्यरत असलेली कोणतीही शाळा निदर्शनास आलेली नाही. तथापी आगामी शैक्षणिक वर्षात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, या बाबत निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे पालकांनी सतर्क राहून प्रवेशापूर्वी संबंधीत शाळेची अधिकृतता तपासणे आवश्यक आहे. कोणत्याही शाळेबाबत शंका असल्यास किंवा अधिक माहितीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती सेलू यांच्याशी संपर्क साधावा पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक हिताचा विचार करून अधिकृत व मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तालूक्यातील अधिकृत व मान्यताप्राप्त शाळांची यादी जिल्हापरिषद परभणी च्या संकेत स्थळावर तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू येथे उपलब्ध आहे.