आपला जिल्हा

लॉयन्स क्लबच्या वतीने 85 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

सेलू ( प्रतिनिधी ) येथील लॉयन्स क्लब च्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीरात 85 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी टप्प्याटप्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली.


येथील चिरायू रुग्णालयात दिनांक 0 7 जून रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणी साठी श्री परमेश्वर वानखेडे यांनी काम पाहिले. तालुका सचिव डॉ बाळासाहेब जाधव , उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश मालाणी,डॉ कुंदन राऊत, दतात्रय उर्फ अप्पूसेठ सोळंके, सहसचिव डॉ. अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ, डॉ आशिष मेहता, डॉ. उमेश गायकवाड, डॉ .कैलास आवटे,अनुप गुप्ता, डॉ सुदर्शन मालाणी, डॉ.परेश बिनायके,सागर लोया, सुभाष मोहकरे, खुशाल तांगडे आदी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!