आपला जिल्हा

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर व अभिवादन…

सेलू, ता. ३ (प्रतिनिधी ): भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वालूर (ता. सेलू) येथील बुधवारी (ता. ३) आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचा वापर मर्यादित करून जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत काटकसर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी परळी (जि. बीड) येथील गोपीनाथ गडावर लोकनेते स्व. मुंढे यांना अभिवादन करण्यासाठी न येता सर्वांनीच पेट्रोल डिझेल इंधन बचत करून आपापल्या गावात, त्या ठिकाणी सामाजिक हिताचे उपक्रम आयोजित करुन पुण्यतिथी साजरी करावी. असे आवाहन राज्याचा मंत्री पंकजा मुंढे यांनी केले होते. वालूर येथील श्री संत भगवान बाबा मित्र मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परभणी येथील
संजीवनी प्रतिष्ठान संचलित श्री हुजूर साहेब ब्लड बँक, रक्तगट प्रयोगशाळा व अफेरेसिसचे व्यवस्थापक शंकर मोरे, डाॅ. विशाल राठोड, डाॅ. अर्चना नरवाडे यांच्या मार्गदर्शनात तंत्रज्ञ आरती वासनिक, पुजा खुपसे, नेहा शेळके यांनी यावेळी रक्त तपासणी करून संकलन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री भगवान बाबा मित्र मंडळाने पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!