आपला जिल्हा

सेलूच्या कर्तृत्ववान लेकीवर अभिनंदनाचा वर्षाव साक्षी कुलकर्णीचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार

सेलू ( प्रतिनिधी ) येथील साक्षी श्रीपाद कुलकर्णी मसलेकर यांनी केंद्र शासनाच्या आपत्कालीन सूचना प्रणालीच्या निर्मिती मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संघटना, पत्रकार संघ, महिला मंडळाच्या वतीने शुक्रवार ( दि.२९) रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी -मराठी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर भास्करराव कुलकर्णी, सत्कारमूर्ती साक्षी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कमी वयात देशपातळीवर सेलूचा नावलौकिक वाढविल्या बद्दल सेलूची कर्तृत्ववान लेक साक्षीवर मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, चंद्रकांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर मनोगतात म्हणाले की,” मुली कुठेही कमी नाहीत हे साक्षीने बुध्दीमत्ता, अभ्यास आणि कर्तृत्ववातून सिध्द केले आहे. छोटासा ग्रामीण भाग गंगामसला व्हाया सेलू ते दिल्ली हा साक्षीचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.” तर नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी, ” साक्षीने भविष्यात इसरो आणि नासामध्ये जाऊन काम करावे. जीवनातील सर्व यशोशिखरे गाठावीत. ” अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले.तर आभार प्रदर्शन सुभाष मोहकरे यांनी केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, महेशराव खारकर, उपेन्द्र बेलूलकर, विजय चौधरी, मनिष कदम,ज्येष्ठ पत्रकार नारायणराव पाटील, शिवनारायण मालाणी, गणेश माळवे, पुनमचंद खोना,विजया कोठेकर, ललिता गिल्डा, वसुधा खारकर, डॉ.भाग्यश्री धामणगावकर, सुनिल गायकवाड, माधव गव्हाणे, नारायण इक्कर, वल्लभ लोया, दत्तात्रय माकोडे, यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्कार सोहळा संयोजन समितीचे समन्वयक डॉ.सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

सत्कार सोहळ्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले

शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी – मराठी ग्रंथालय, नूतन विद्यालय, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान, शारदा विद्यालय, विवेकानंद शैक्षणिक संकुल,जनुभाऊ रानडे व्याख्यानमाला, पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मिडीया, सेलू नागरी सहकारी पतसंस्था, टेबल टेनिस असोशियशन, महाराष्ट्र, पेंशनर्स असोशियशन, महिला मंडळ,सेलू, मॉर्निंग गृप, नवचेतना प्रतिष्ठान, नूतन महाविद्यालय, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद, रेल्वे प्रवासी संघ, श्री शंकरलिंग मंदिर देवस्थान या संस्थेच्या वतीने साक्षी कुलकर्णीचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!