सेलू ( प्रतिनिधी ) दि. 06 जुलै 2026 : आर्य वैश्य महासभा, परभणी जिल्हा यांच्या वतीने सेलू येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विविध शैक्षणिक व विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास आर्य वैश्य महासभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. माधव अण्णा लोकुलवार, परभणी जिल्हा उपाध्यक्ष श्री. मोहन कोत्तावार, जिल्हा सहसचिव श्री. विकास गादेवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. नागनाथ कलकोटे तसेच सेलू येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी कु. सानवी कैलास मरेवार (होमी भाभा बालवैज्ञानिक), कु. नंदिनी शशिकांत मालशेटवार (९७% गुण), प्रज्वल दिनेश गौशटवार (सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक) आणि सूरज संजय कोटलवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास श्री. बालाजी काचेवार, श्री. शिवाजी काचेवार, श्री. कृष्णकुमार गादेवार, श्री. गोविंद दाचावार, श्री. ज्ञानेश्वर राजकोंडवार, श्री. योगेश कोटलवार, श्री. ज्ञानेश्वर फुटाणे, श्री. गजानन फुटाणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.