सेलू (प्रतिनिधी ) येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात प्रसिद्ध उद्योजक तथा माजी न प सदस्य संजय श्रीनिवासजी लोया यांच्या तर्फे 180 होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी डी शिंदे तर प्रमुख पाहुणे जेष्ठ शिक्षक श्री रोहीदास चव्हाण, मुख्याध्यापिका सौ उषा कामठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिमान पाईकराव यांनी, तर सुभाष मोहकरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ अर्चना पठारे- फोपसे, संदीप जुमडे, सोमेश शिदे,आनंद देवधर्म6 , सौ. काळे विजय अंभुरे, नानासाहेब भदर्गे, भारती मुळे, राणी फुलरी, सौ साडेगावकर
आदींनी परिश्रम घेतले.