आपला जिल्हा

*केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान रविवारी परभणी दौऱ्यावर

कृषी विद्यापीठात 'कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे' उद्घाटन

परभणी, दि. २७ (प्रतिनिधी ) : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हे रविवारी (२८ जून) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करणार आहेत.

दौऱ्यानुसार, केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे दुपारी ३.३० वाजता नांदेड येथून वाहनाने परभणीकडे रवाना होतील. सायंकाळी ४.३० वाजता ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे पोहोचतील. येथे ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करतील.

कार्यक्रमानंतर सायंकाळी ५.३० वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!