आपला जिल्हा
स्टेट बँक इंडिया सेलूत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची होतेय गैरसोय…
कर्ज विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना नाहक त्रास

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शाखेच्या SBIN0003797 वालुर रोड रोड सेलू या ठिकाणी कर्ज विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना होणाऱ्या गैरसोय होत आहे अशा तक्रारीवरून ग्राहक पंचायत सेलुच्या वतीने शाखा व्यवस्थापक श्रीमान विवेक कुमार यांना विचारणा व त्या टेबलवर जोपर्यंत अथोराईज कर्मचारी येत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती करण्यास गेले आसता व्यवस्थापक विवेक कुमार यांच्या कडुन अनपेक्षित असे उत्तर मिळाले. ते म्हणाले मागील 40 ते अधीक दिवसांपासून या टेबलचे आसणारे श्री प्रविण जायभाय यांची बदली झाली आहे. मी देखील बदली होऊन नुकताच या शाखेचा चार्ज घेतला आहे आम्हि कामाने त्रस्त असतो. आम्हि कर्ज विभागात जोपर्यंत या टेबलवर कोनी नवीन कर्मचारी ऐत नाही तोपर्यंत काहि व्यवस्था करू शकणार नाहीत.
“तुम्हे हमारी जो भी शिकायत करणी है हमारे वरीष्ठ से करे उसका जवाब हम हमारे शिनीयर को देगे लेकीन हम ईस बारे मे कुच नही कर सकते.”



