सेलू, ता. २८ (प्रतिनिधी ): पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत सेलू शहरात २७ केंद्र आणि दोन फिरते पथकद्वारे रविवारी (ता. २८) ० ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला लस देण्यात आली.सेलू शहरात पल्स पोलिओ लसीकरणाचे 89.22 टक्के उदिष्ट पूर्ण झाले असून 7322 पैकी 6663 लसीकरण आज रोजी करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय हरबडे यांनी दिली.
दरम्यान आज सकाळी उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने शहरासह तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी आयोजन केले. नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्याहस्ते बालकाला पल्स पोलिओ पाजून लसीकरण प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, डाॅ. ॠतुराज साडेगावकर, यांच्यासह पत्रकार, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.