आपला जिल्हा

मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील घटना

सेलू ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण का भेटत नाही, आरक्षण मिळाले पाहीजे या विवंचनेतुन मुकेश रंगराव पवार वय 35 वर्ष युवकाने शेततळ्यामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि 31 मे रोजी सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथे घडली.

या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात विठ्ठल सुंदरराव पवार यांच्या खबरीवरून अकस्मिक मृत्यु ची नोंद घेण्यात आली.
घटनास्थळ स.पो.नि. कृष्णा घायवट, पोह /506 जाधव यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. घटनेचा अधिक तपास पोह/506 जाधव करत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!