परभणी ( प्रतिनिधी ) परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मनोहरराव विठ्ठलराव कदम यांचे आज सकाळी निधन झाले असून, मागील काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात बहिण, भाऊ पत्नी, दोन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार होता. माजी नगरसेवक विनोद कदम यांचे ते चुलते होते. त्यांच्यावर आज परभणी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले..