आपला जिल्हा

नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या राज्य सरचिटणीसपदी निवड

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू: नगरीचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या वतीने राज्य सरचिटणीस म्हणून महासंघाच्या नूकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत निवड करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यभरातून जवळपास 100 नगराध्यक्ष उपस्थित होते, मिलिंद सावंत यांच्यावर”छत्रपती संभाजी नगर (मराठवाडा विभाग) व उत्तर महाराष्ट्र विभागाची” जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या उल्लेखनीय सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची नगर परिषद महासंघाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल नगराध्यक्ष महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, अध्यक्ष रूचिता राजेंद्र घोरपडे, संयोजक लक्ष्मणराव लटके यांनी स्वागत केले आहे.या निवडीबद्दल राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार श्रीमती मेघनादीदी बोर्डीकर, माजी आमदार श्री रामप्रसादजी बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे, पाथरीचे नगराध्यक्ष श्री आसेफ खान, सोनपेठ नगराध्यक्ष श्री परमेश्वर कदम, जिंतूर नगराध्यक्ष श्री प्रताप देशमुख, मानवत नगराध्यक्ष श्री डॉ अंकुश लाड यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!