आपला जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस ०४ महिने साध्या कैदेची शिक्षा

सेलू न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणी दि १९/०५/ २०२६ रोजी एस.सी.सी.क्र. १७८/ २०१३ या प्रकरणात महत्वपुर्ण निर्णय दिला. सदरील प्रकरणातील फिर्यादी अशोक नारायणराव ढगे यांच्याकडून नातेवाईक आजारी असल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी आरोपी भागीरथ नारायण गायकवाड यांनी रक्कम रूपये १,००,०००/- (अक्षरी रूपये एक लाख) हात ऊसणे घेतले होते. सदरील घेतलेले पैसे हे फिर्यादी अशोक ढगे यांनी आरोपी भगीरथ गायकवाड यांना परत देण्या बाबत मागणी केली असता भगीरथ गायकवाड यांनी रक्कम रूपये १,००,०००/- (अक्षरी रूपये एक लाख) नगदी स्वरूपात न देता सदर रक्कमेचा धनादेश दिला होता व सदरील धनादेश बँकेत जमा करून एक लाख उचलून घ्या असे सांगीतले होते. परंतू सदरील धनादेश हा खात्यावर अपुऱ्या रक्कमे अभावी धनादेश वटल्या गेला नाही तेंव्हा फिर्यादीस त्याची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. म्हणून फिर्यादी अशोक ढगे यांनी धनादेश पराक्रम्य अधिनियम या कायद्या प्रमाणे आरोपी भगीरथ गायकवाड यांच्या विरूध्द कायद्या प्रमाणे रितसर कार्यवाही केली. सदरील प्रकरणातील साक्षीपुरावा ग्राहय धरून मा. फौजदारी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सेलू येथील न्यायाधीश मा.जी.ए. तराळ साहेबांनी आरोपी भगीरथ नारायण गायकवाड यास कलम १३८ एन. आय. अॅक्ट नुसार दोषी ठरविले, त्यामध्ये ०४ महिने साध्या कैदेची शिक्षा, नुकसान भरपाईची रक्कम १ लाख रूपये ३० दिवसात फिर्यादीला द्यावी तसे न केल्यास पुन्हा ०२ महिने साध्या कैदेची शिक्षा द्यावी असा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणी फिर्यादी अशोक नारायणराव ढगे यांच्या वतीने अॅड. प्रभाकर गिराम यांनी कामकाज पाहीले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!