आपला जिल्हा

सेलूत आजपासून चौथी राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा २८ जिल्ह्यातील खेळाडू होणार सहभागी

श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त उपक्रम

सेलू:( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था व परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त निमित्त मंगळवार ( दि. ०५ ते ०७ ) मे या कालावधीत चौथ्या राज्यस्तरीय सिनियर ( पुरूष व महिला ) लेक्रॉस स्पर्धेत परभणी, बीड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, गोंदिया, अमरावती, नागपूर, रायगड,भंडारा, मुंबई शहर,मुंबई उपनगर, नाशिक, पुणे, नांदेड, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, वाशीम, अकोला, हिंगोली, चंद्रपूर, जळगाव,वर्धा, जालना या २८ जिल्ह्यातील खेळाडू ( मुलं,मुली ) सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहेत. अशी माहिती राज्यस्तरीय लेक्रॉस स्पर्धेचे संयोजक पर्यवेक्षक गणेश माळवे,जिल्हा सचिव प्रशांत नाईक, यांनी दिली.


स्पर्धा यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, एन.पी.पाटील,मुख्याध्यापक संतोष पाटील,निशा पाटील, उल्हास पांडे, जिल्हा सहसचिव कैलास माने,संजय भूमकर,प्रा . सत्यम बरकुले,किशोर ढोके राजेश राठोड, अनुराग आंबटी,आणि स्पर्धेसाठी गठीत विविध समित्यातील सदस्य परिश्रम घेत आहेत.

आज लेक्राॅस स्पर्धेचे उद्घाटन

तीन दिवसीय राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धेचे उद्घाटन नूतन कन्या प्रशालेच्या कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात मंगळवार ( दि.०५ ) रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. तर उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू मंगल पांडे,महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुमेधा ठाकुर, सरचिटणीस डॉ. मोहम्मद बाबर, जिल्हाध्यक्ष संतोष कंठाळे, नगर परिषदेचे क्रीडा सभापती मिलिंद पवार उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!