सेलू : ( प्रतिनिधी) उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील वर्ग-४ कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ. विलास मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय हरबडे होते.
यावेळी बाळासाहेब काजळे, अनवर तडवी, डॉ. संतोष देशमुख, डॉ. प्रकाश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी काटकर, श्रीमती पंडित मॅडम आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंद्रजीत मगर, योगेश बिडला, अशीष बचाटे, प्रवीण नाईकनवरे, शेख शगीर, जीवन भदरगे, राधाकिसन मगर, पवन फरकांडे, अभिषेक देशमुख, गणेश पडोळे, श्रीमती उषा राजू यादव, श्रीमती शेख बिस्मिल्ला व साईनाथ देशमुख यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ. विलास मोरे यांनी महाराष्ट्राचे देशासाठी असलेले योगदान व कामगार कायद्यांचे महत्त्व अधोरेखित करत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय हरबडे यांनी रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी सर्वांनी समर्पितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन पवन फरकांडे यांनी मानले. कार्यक्रम उत्साहात पार पडला.