सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील रवळगाव येथे एका युवकांने दारुच्या नशेत व नैराश्यातुन कटरने गळा कापुन नंतर साडीच्या साह्याने गळ्याला फास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि 30 एप्रिल रोजी घडली.
मिळालेल्या माहिती नुसार सेलू पोलीस ठाण्यात नारायण शंकर साळवे यांनी खबर दिली त्या नुसार मयत आत्माराम नारायण साळवे वय 31 वर्ष व्यवसाय मजुरी आत्महत्या प्रकणी सेलू पोलीस ठाण्यात आ. म्र नं 15/2026 कलम 194 बी. एन. एस. एस नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
घटनास्थळी मा उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे साहेब, स.पो.नि. कृष्णा घायवट , स.पो.नी.पुंगळे मॅडम यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास सपोनि कृष्णा घायवट करत आहेत.