सेलू ( प्रतिनिधी ) येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार ( दि. २१ ) रोजी मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आयोजित करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सर्वानुमते नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची स्वागताध्यक्ष पदी तर नगर सेवक सुबोध काकडे यांची जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणी अशी कार्याध्यक्ष – सुनिल हिवाळे, उपाध्यक्ष – सुनिल धापसे, सचिव – प्रविण धापसे , कोषाध्यक्ष – विकास धापसे , सहसचिव – अमित धापसे, संघटक – दत्ता तांबे, सल्लागार – बबन शिरसाट, गोविंद काळे, गोविंद भदर्गे, खंदारे मामा, रवी अवचार तर वैचारिक आणि सांस्कृतिक समितीत मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके, सुरेश रणखांब, माजी मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे, डॉ. सुरेश हिवाळे, मुक्तिराम वाव्हळे, गजानन साळवे, विलास साळवे, अवचार, पाईकराव यांची निवड करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे.