सेलू ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाच्या विभागाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची निवड करण्यात आली.
या निवडी बद्दल जिल्ह्याचे नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, राज्याच्या मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादीदी बोर्डीकर व परभणी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचे मिलींद सावंत यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले.
निवडीचे पत्र देतेवेळी भाजप निवडणूक प्रभारी दिनकर वाघ,जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट, डॉ पंडित दराडे, प्रसाद खारकर,भाजप तालुकाध्यक्ष श्री गणेश काटकर सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार,सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे, जिल्हा परिषद सदस्य संजय साडेगावकर, जिल्हा परिषद सदस्य अजय डासाळकर,उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, कैलास काळे नगरसेवक सुबोध काकडे,व सर्व भाजप नेते कार्यकर्ते उपस्थित होते.