सेलू(प्रतिनिधी )तालुक्यातील 5 गट व 10 गणांसाठी दिनांक 07 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासाठी साठी निश्चित केलेल्या 130 बुथ साठी आवश्यक असलेल्या EVM यंत्रांची सिलिंग प्रक्रिया शनिवारी दि. 31 जानेवारी रोजी पूर्ण झाली असुन 126 वाढीव कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवार दिनांक 02 फेबुवारी व दुसरे प्रशिक्षण बुधवार दिनांक 04 फेबुवारी रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय सेलू येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव यांनी दिली.
दिनांक 07 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिप व पं स सार्वत्रीक निवडणूकीच्या दिवशीच राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असल्या कारणाने निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या परिक्षार्थी शिक्षकांना TET परिक्षा देण्यासाठी निवडणूक कार्यातून सुट देण्यासाठी अर्ज केले आहेत. त्या अनुषंगाने 18- PRO , 18- FPO, 14 -OPO-1, तर 86 Opo-2 अशा एकुन 126 कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कर्तव्यावर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणा साठी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधिल कलम 134 अन्वये तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
EVM सिलिंग साठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ शिवाजीराव मगर, नायब तहसीलदार विजय मोरे, श्रीमती जयश्री कोल्हे, महसुल अधिकारी हरिश टाक, रवी बंदुके, अशोक राऊत, प्रताप शेरे, शेख नूर ,विजय सोंजे, मास्टर ट्रेनर टीम प्रमुख सुनील राठोड, प्रा.महेश कुलकर्णी, गजानन साळवे, विकास मुपडे यांच्या सह मास्टर ट्रेनर प्रा.प्रशांत देशपांडे, प्रा.मोहन पाटील, प्रा.अजय उंडेगावकर, प्रा.अविनाश सुत्रावे, प्रा.गणेश माळवे, प्रा .घुलेश्वर, धर्मकुमार वानरे, एकनाथ जाधव, सुभाष मोहकरे,राजेंद्र होलसूरे, राजू द्यावरवार, प्रमोद रोडगे, किशोर ढोके, विलास कदम, नितीन खाकरे, राजेश राठोड, विष्णू काळे, प्रताप पवार, अनिल कदम, संजय भूमकर, पद्माकर गोंडगे , महादेव चोकनफळे, सूर्यकांत गणाचार्य , बाबासाहेब पंडीत, महाजन
यांनी परिश्रम घेतले.