आपला जिल्हा
मेघना बोर्डीकर यांनी सेलू पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवला…तर जि. प. गटातील पाचही जागेवर भाजपचे उमेदवार विजयी.

सेलू ( प्रतिनिधी )सेलू तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदेचे निकाल आज सोमवार रोजी जाहीर झाले या निकालात परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत राष्ट्रवादी च्या ताब्यात असलेली पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवला तर जिल्हा परिषदच्या पाच गटातील गटातील सर्वच सदस्यांना निवडून आणून राष्ट्रवादीला धोबी पंचाड दिली.पंचायत समिती साठी एकूण दहा गणापैकी तब्बल आठ जागेवर भाजपने आपले उमेदवार विजयी केले तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले.




