आपला जिल्हा

बारावी बोर्ड परीक्षेत सेलू परीक्षा केंद्रावर 717 विद्यार्थी प्रविष्ट

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2026 सेलू शहरात सुरळीत सरु

सेलू ( प्रतिनिधी)  उच्च माध्यमिक बारावी बोर्ड परीक्षा 2026 साठी सेलू शहरातील दोन केंद्रावर सुमारे 717 विद्यार्थी प्रविष्ट झालेत आज दि. 10 फेबूरवारी रोजी इंग्रजी विषयाने परीक्षेची सुरुवात झाली.

सेलू येथील नूतन महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर 16 हॉल मधून 392 विद्यार्थी परीक्षा देत आहेत या केंद्रावर केंद्राध्यक्ष डॉ. एस. जी.घुलेश्वर, महाविदयालयचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, पर्यवेक्षक प्रा. सोनवणे सर काम पाहत आहेत तर न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू या केंद्रावर 325 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून भागवत डी यु काम पाहत आहेत.

सध्या प्रशासनाकडून कॉपीमुक्त परीक्षा वर भर दिला असून प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त, बैठे पथक, भरारी पाथकांची नेमणूक केली असून एकही केंद्रावर कॉपी होणार नाही.
या बाबत काळजीपूर्वक नियोजन सेलू गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी केले असून ते या परीक्षा केंद्रावर बारकाईने लक्ष देत आहेत.

या वेळी सेलूतील परीक्षा केंद्राला उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ शिवाजी मगर यांनी सेलू परीक्षा केद्रास भेट दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!