आपला जिल्हा

लॅक्रॉस खेळात महाराष्ट्रातील खेळाडूंना उज्वल भवितव्य:- शैलेश लाहोटी

सेलू च्या नूतन मध्ये राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ

सेलू (प्रतिनिधी ) लॅक्रॉस सारखे अपरिचीत विदेशी खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले आहेत,त्यामुळे परंपरागत खेळा पेक्षा महाराष्ट्रातील खेळाडूंना लॅक्रॉस या खेळ प्रकारात उज्वल भवितव्य आहे त्याचा खेळाडूंनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले.


येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू व परभणी जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती वर्षा निमित्त आयोजित चौथ्या राज्यस्तरीय सीनियर लॅक्रॉस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
कन्या प्रशालेच्या श्रीमती कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात बुधवार दिनांक 6 मे रोजीआयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.एस.एम. लोया,प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे नगराध्यक्ष मिलिंद सावंत,असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ.सुमेधा ठाकूर राज्यचिटणीस डॉ.मोहम्मद बाबर संस्था सचिव डॉ.विनायकराव कोठेकर उपनगराध्यक्ष साईराज बोराडे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शिक्षण सभापती मिलिंद पवार माजी जि प सभापती अशोक नाना काकडे ,नंदकिशोर बाहेती , दतराव पावडे , कैलास माने , जिल्हा सचिव प्रशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत राज्यभरातून 26 पुरुष व 14 महिला अशा एकूण 40 संघानी सहभाग नोंदवला असून या स्पर्धेतून महाराष्ट्राचे महिला व पुरुष संघ निवडले जाणार आहेत.स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साखळी फेरीतून पुरुष संघात परभणी, धुळे , नागपूर, धाराशिव,नंदुरबार, बीड, कोल्हापूर , जळगाव संघानी विजय संपादक करून बाद फेरीतप्रवेश केला तर महिला गटात नागपूर ,बुलढाणा ,गोंदिया, नाशिक व वाशिम संघाने साखळी फेरीतून बाद फेरीत प्रवेश केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विनायकराव कोठेकर सूत्रसंचालन गोपाळ आम्ले तर आभार पर्यवेक्षक गणेश माळवे यांनी मानले.

लॅक्रॉस खेळाला नोकरीत 5 % आरक्षण:-बाबर

या खेळ प्रकाराला नोकरीत पाच टक्के आरक्षणाची मंजुरी महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाली आहे अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव मोहम्मद बाबर यांनी याप्रसंगी खेळाडूंना दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!