सेलू ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८६ वा वर्धापनदिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त गुरूवार ( दि. ०३ ) जुलै रोजी दुपारी ०३.३० वाजता नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया असतील. तर संस्थेचे माजी विद्यार्थी नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश मंत्री ( परभणी ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. निवृत्त वनाधिकारी टी.के.कुलकर्णी ( सेलू ) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. देशपांडे गुरुजी, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी आणि कार्यकारिणी मंडळ यांनी केले आहे.