सेलू( प्रतिनिधी ) येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील २७ विद्यार्थीनींनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे च्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती ( एन.एम.एम.एस.) परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी यादी जाहीर होणे बाकी आहे. एन.एम.एम.एस. परीक्षेत प्रतिक्षा चिंचोलकर या विद्यार्थीनीने सर्वाधिक ( १५६ ) गुण घेऊन सेलू तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर वैदेही गावंडे ( १४५ ), अनुजा जवळकर, श्रुती ताठे ( १२५ ), धनश्री गायकवाड ( १११ ), तेजल ढगे ( ११० ), नम्रता कटारे ( १०८ ), सिद्धी आवटे ( १०४ ), रिद्धी मोगल ( ९७ ), अक्षरा कदम (९६) , धनश्री चव्हाण ( ९४ ), साक्षी फंड, कार्तिकी खेडेकर (९३ ), सिद्धी बावणे (९१ ), धनश्री पतंगे (९० ), अपेक्षा लहाने ( ८९ ), सिद्धी टाके ( ८७ ), हिमांशी मेहता ( ८६ ), कीर्ती धोंगडे ( ८३ ), मधुरा हरकळ (८० ), साक्षी चव्हाण ( ७९ ), श्रुती भाबट ( ७८ ), साक्षी ढगे ( ७६ ) , दिव्या वायाळ ( ७५ ), धनश्री चव्हाण ( ७२ ), पुनम लोखंडे ( ७० ), विशाखा प्रधान ( ६१ ) गुण प्राप्त करून यश संपादित केले आहे. एन.एम.एम.एस. परीक्षेतील यशा बद्दल यशस्वी विद्यार्थीनी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील शिक्षक एन.एम.एम.एस. विभाग प्रमुख संध्या आमटे, कैलास मलवडे, सतीश कुंडीकर, सुहास देऊळगावकर, भालचंद्र गांजापुरकर, अतुल पाटील, विनोद शिंदे, एस.बी.दामा, एस.व्ही. रासवे, किर्ती राऊत, जे.एस.बिरादार, राजेश राठोड यांचा प्रशालेच्या वतीने गुरुवार ( दि. २६ ) रोजी सत्कार करण्यात आला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे गुरुजी, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापक निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक डी.बी. घोगरे यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.