सेलू ( प्रतिनिधी ) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी व मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एक दिवस एक पुस्तक उपक्रमांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजीसायंकाळी ६:०० वा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “हिंदुत्वाचे पंचप्राण” या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपेंद्र बेल्लुरकर (उत्कृष्ट वाचक, सेलू) वक्ते डॉ. दिवाकर दत्तात्रयराव कुलकर्णी मांडाखळीकर (कार्याध्यक्ष आणि सचिव स्वा. सा. फाउंडेशन संचलित स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, परभणी)”एक दिवस एक पुस्तक” या मासिक उपक्रमात आपण आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय, सेलू उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, चंद्रशेखर मुळावेकर(सचिव) यांनी केले आहे.