आपला जिल्हा

उपविभागीय अधिकारी सेलू शैलेश लाहोटी यांनीअवैध वाळूची हायवा व ट्रॅक्टर पकडले

सेलू ( प्रतिनिधी ) उपविभागीय अधिकारी सेलू शैलेश लाहोटी यांनी 02 अवैध रेती वाहतुक करणारे वाहने पकडून केली कार्यवाही.

जिंतुर तालुक्यतील मौजे शेवडी येथे अवैध रेती वाहतुक करीत असतांना हावया क्र. MH-22 AM-6112 त्या मध्ये अंदाजे 05 ब्रास रेती विना पावती आढळुन आले असल्याने तहसिल कार्यालय येथे लावण्यात आले आहे. सदर कार्यवाही ग्राम महसुल अधिकारी गांवडे यांनी मा. उपविभागीय अधिकारी सेलू शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

तसेच शैलेश लाहोटी यांनी दि. 25.02.2026 सकाळी 8.00 वाजता स्वःता सेलू येथील वालुर नाका परीसरात अवैध रेती वाहतुक करणारे वाहन ट्रॅक्टर नंबर. MH-22 X-0646 असुन वाहन मालक डिंगाबर प्रभाकर काष्टे रा. राजवाडी यांचे मालकीचे वाहन अवैध रेती वाहतुक करीत असतांना आडळुन आल्याने तहसिल कार्यालय सेलू येथे लावण्यात आले आहे.
सध्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी सेलू उपविभागात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम सुरु केली असून त्या मुळे वाळू माफियाना दिवसा तरी वचक बसला आहे परंतु रात्री अपरात्री रेतीमाफिया अवैध वाहतूक करतच असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. रात्रीची सुद्धा चोरटी वाहतूक बंद व्हावी असे नागरिकांतून बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!