आपला जिल्हा
थकबाकी भरा नसता होतोय ऑटोमॅटिक वीजपुरवठा खंडित
सेलू शहरात स्मार्ट मीटर बसविल्याने मुंबईवरूनच होते वीज पुरवठा खंडित.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील महावितरणच्या विज बिल थकबाकीदारांना मोठा झटका बसत आहे कारण सेलू शहरातील बऱ्याच वीज थकबाकीदार ग्राहकांचा ऑटोमॅटिक वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांची गैरसोय झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
यामुळे सेलू शहरात रमजान महिन्यातच महावितरण कडून होत असलेल्या अचानक वीज पुरवठा खंडित मुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत.
सेलू येथील वीज वितरण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मन्हण्यानुसार आता सेलू शहरात स्मार्ट मिटर बसवलेल्या वीज ग्राहकांची थकबाकी राहिल्यास त्यांच्या मोबाईल वर संदेश पाठवण्यात येत आहे जर त्या संदेशाकडे दुर्लक्ष झाल्यास मुंबईवरूनच ऑटोमॅटिक वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे त्या मुळे तुम्ही ज्या दिवशी थकीत बिल भराल त्या दिवशी तुमचा वीज पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात येत आहे.
थकबाकीदारांना दिलासा नाही
एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यास जोपर्यंत पूर्ण थकबाकी ऑनलाइन भरली जात नाही तो पर्यंत तुमचा विजपूरवठा सुरळीत होणार नाही त्या मुळे वीज ग्राहकांना दोन टप्प्यात पैसे भरण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
या प्रकारमुळे ज्या वीज ग्राहकांची थकबाकी मोठ्या रकमेची आहे त्यांना वीज पुरवठा सुरू करून घेण्यास अनेक अडचणी येत आहेत.तर ज्या नागरिकांनी आपली थकबाकी भरलेली आहे तरी देखील अशा नागरिकांची वीजपुरवठा दोन चार दिवसा पासून सुरळीत न झाल्याने वीज ग्राहक परेशान झाले आहेत.



