आपला जिल्हा

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

नूतन विद्यालयाचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालयात मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त सोमवार ( दि.२३) रोजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी ‘ स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. सोबतच प्रशालेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निबंध स्पर्धा आणि स्वच्छता अभियानात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शालेय परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड, सहविभाग प्रमुख डॉ. सुरेश हिवाळे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रतिनिधी सुनिता सांगुळे, किशोर कटारे, भगवान देवकते आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!