आपला जिल्हा

नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी)  येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था वर्धापनदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेले सात दिवसीय नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर बुधवार ( दि. १८ ) रोजी साई नाट्य मंदिरात शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या धनंजय सरदेशपांडे लिखित ‘ क्लोन’ आणि कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेचे नाट्य रुपांतर असलेल्या ‘ पिशी मावशी’ या दोन नाटीकेच्या सादरीकरणाने उत्साहात संपन्न झाले.

नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पांडव यांची उपस्थिती होती. तर छत्रपती संभाजी नगर येथील ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य प्रशिक्षक शरद कुलकर्णी,जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, प्रसिद्ध रंगकर्मी संतोष कुलकर्णी, उपेंद्र बेलूरकर, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात दिपक देवा यांनी विविध पक्षांचे आवाज काढून श्रोत्यांची मने जिंकली. पालकांच्या वतीने अश्विनी ढाकणे यांनी तर श्रीराम खिस्ते, अक्षरा पवार, स्वरा देशपांडे, अनुष्का शेडुते, अनुष्का चव्हाण, उत्तरा लोंढे, अनया ढाकणे या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नाट्य प्रशिक्षण शिबिर संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन भालचंद्र गांजापुरकर यांनी केले. नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. अनिल कुलकर्णी, रवि मुळावेकर, रवि कुलकर्णी, शशिकांत देशपांडे, शिल्पा बरडे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, सच्चिदानंद डाखोरे, नागेश देशमुख, मिरा शेटे, सरस्वती शेरे, सूर्यकला सूर्यवंशी, पुजा महाजन, अरूण रामपुरकर यांनी पुढाकार घेतला.

मुलांना आवडते ते करू द्या
– शरद कुलकर्णी

छत्रपती संभाजी नगर येथील ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य प्रशिक्षक शरद कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणाले की, ” मुलांना आवडते ते करू द्या. तरच आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांचे भविष्य उज्वल होते. “

नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकास

नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकासाकडे हे ब्रीद घेऊन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने १२ जून ते १८ जून या कालावधीत घेण्यात आलेल्या नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध अभिनेते धनंजय सरदेशपांडे ( पुणे ) आणि ज्येष्ठ रंगकर्मी शरद कुलकर्णी ( छत्रपती संभाजी नगर ) यांनी अभिनय व अभिनयाचे प्रकार शिकविले, नाट्य घटक, रंगमंच ओळख करून दिली. मनाच्या एकाग्रतेसाठी योगासन व प्राणायमासोबत निरिक्षण, कल्पना शक्तीचा विकास होणारी, सभाधिटपणा , आत्मविश्वास वाढविणारी नाट्य खेळ घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!