सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल चे शिक्षक शेषराव नागरे सर 27 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर नियतसवयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. त्यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय भागवत, सत्कार मुर्ती शेषराव नागरे, सुनिता नागरे, भाऊसाहेब निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय मोरे यांनी तर सुत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी भाऊसाहेब निकम,प्रनयना तेलगोटे, सुनिता नागरे-दहिफळे,डी सी सोळंके, तोटेवाड जि के, सिध्दांत नागरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. शेषराव नागरे सरांनी विद्यार्थ्यांसाठी अद्यावत प्रोजेक्टर शाळेला भेट दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे, मानू बेग, अभिजीत कदम, विष्णू सरकटे यांनी सहकार्य केले.