सेलू ( प्रतिनिधी ) हज ही मुस्लिम धर्मियांची पवित्र यात्रा असून हज यात्रेकरू चा सत्कार साईबाबा नागरी बँके च्या मुख्य कार्यालयात बुधवार दि. 29 एप्रिल रोजी करण्यात आला.
या कार्यक्रम चे अध्यक्ष बँकेचे सस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष तथा न प चे गट नेता पवन आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, नगर सेवक मिलिंद पवार,अमजद बागवान,पठाण अन्वर खान विनोद धापसे संचालक, ओम तोशनिवाल,राजेंद्र माणियार,सुभाष चव्हाण,बालचंदानी कान्हयालाल,ऍड भगवान राव शिरसाठ,प्रताप सेठ कांचन संजय मगर,जगनाथ डोबे,गजमल आसाराम दतरावं आंधळे, शेख इम्रान कार्यक्रमाचे प्रस्ताविक बँके चे मु. का. अधिकारी रामराव लाडाने,यांनी केले याच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.
या वर्षी हज यात्रे साठी जाणाऱ्या मध्ये खुद्रुतुला अन्सारी,हमीद भाई बागवान,कौसर भाई गुत्तेदार,पाषाभाई गुत्तेदार,रशीद भाई बागवान,सयद दिलावर भाई,गौस भाई अन्सारी,शेख शमशोद्दीन,अन्सारी जुनेद,जिलानी कुरेशी सत्कार मक्का मदीना चे फोटो व शाल हार देऊन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी यात्रा करावी असा कुराण मध्ये लिखित आहे ही एक पवित्र यात्रा समजली जाते त्या मुळे जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक मुस्लिमाची इच्छा असते
अल हिज्जाह या महिन्या मध्ये सौदी अरबीया या देशातील मक्का व मदीना या पवित्र शहरी भरते शक्य असल्यास प्रत्येक मुस्लिम ने आयुष्य तुन एकदा तरी ही यात्रा करावी असे सबोधले जाते
कार्यक्रमाचे चे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी केले आभार व्यवस्थापक निसार पठाण यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी,सुनील आडळकर उमेश खरावणे,संतोष जायभाय, अजय मरळी, यांनी प्रयत्न केले.