आपला जिल्हा

एसएससी 1972 बॅचच्या आर्थिक सहयोगातून सभागृहाचे नूतनीकरण

सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन विद्यालय सेलू येथील कै रा.ब. गिल्डा सभागृहाचे एसएससी 1972 बॅचच्या आर्थिक सहयोगातून नूतनीकरण झाले या सभाग्रहाचे उदघाटन शुक्रवार दि. 24 एप्रिल रोजी संपन्न झाले.

या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. एस .एम. लोया होते तर उदघाटक म्हणून माजी विद्यार्थी मा. हेमंतराव आडळकर मा. रामप्रसाद घोडके,मा श्याम मणियार,मा डॉ.सुभाष परताणी, मा प्रा.भगवान टेकाळे, मा पांडुरंग मगर मा शरयू मुळावेकर यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी के देशपांडे, चिटणीस डॉ. व्ही.के कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी,प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी,शालेय समिती अध्यक्ष सीतारामजी मंत्री, यांची उपस्थिती होती.

 सुरुवातीला  एसएससी बॅच  1972 च्या विद्यार्थ्यांचे हस्ते नूतन शिक्षण संस्थेतर्फे नूतनीकरणा अगोदर संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमाचे व्यासपीठरुपी दालनांच्या देखाव्याचे उद्घाटन माजी विद्यार्थ्यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यकर्माचे सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी तर आभार मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!