आपला जिल्हा

रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात कृषी मंत्री यांना सेलू तालुका दबावगटाचे साकडे

परभणी /प्रतिनिधी सध्या खतांच्या किंमतीमध्ये संबंधित कंपन्यांनी प्रचंड दरवाढ केल्याने येत्या खरीप हंगामात शेती व्यवसायावर मोठे संकट आहे आहे. याबाबतची बातमी नुकतीच वृत्त प्रसिद्ध झाल्याने शेतकरी बांधव अतिशय परेशान झाला ला आहे. शासनास शेती व्यवसाय बंद करायचे आहे का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. गेल्या सात -आठ वर्षातील शेती व्यवसाय बघता कधी अतिवृष्टी तर कधी पाऊस नाही. या कारणाने शेती व्यवसाय संकटात आहे.
त्यामध्ये शेतमालाच्या किंमती या अत्यंत कमी. बाजारात व्यापारी कायम शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करतात त्यावर कृषी विभाग, बाजार समिती यांचे कसल्याही प्रकारचे नियंत्रण दिसून येत नाही.त्यामुळे शेतक-यांची फसवणुक व जुट, होते. तसेच गेल्या चार- पाच वर्षात कृषी विभागाच्या बेजबाबरार पणा व तुआत की पणामुळे मराठवाडयात राजरोसपणे अप्रमाणीत सर्रास विक्री झाली. त्याचप्रमाणे बंदी असलेल्या औषधांची देखील खरीप हंगामात व्यापारी सर्रास विक्री करतात. बियाणे वा खतांची कृत्रिम इंचाई ट्चाई निर्माण करण्यात चढ्या दराने खते, बियाणे यांची विक्री लिकिंग पद्धतीने करण्यात येते.
कृषी अधिकारी व कृषी विभाग बाजार समित्‌या याकडे हेतुतः इलेस करतात. हंगाम सुरु होण्यापूर्वि आढाव बैठक होतच नाहीत. त्यामुळे जिल्हयात निर्माण होणारा खते, बियाणे, यांचा उच्च कृत्रिम तुटवड्यास, टंचाईस व्यापाटी व अधिकारी वर्ग जबाबदार आहे. मात्र यामध्ये बळीराजा नाहक भडला जातो.
वारंवार संबंधित कृषी खात्यास निवेदन देण्यात येतात परंतु परभणी जिल्ह‌यातील अनेक तालुक्यांच्या कृषी अधिकारी पदाचा पद‌भार हा प्रभारी व्यक्तेिकडे असतो. अनेक तालुक्यांना कृषी अधिकारी नाहीत. पद रिक्त आहेत. शासून पद भरण्यास उदासीन रिसते त्यामुळे सर्रास गैर प्रकार वाढतात. व्यापारी वर्ग हा निढावला आहे.त्यामुळे ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर खते, बियाणे ई. ची कृत्रिम टंचाई, काळाबाजार, चढ्या दराने व लिकिंग सह विक्री सर्रासपणे चालते. शेतकरी बांधवाचा बळी जातो.
यामध्ये पुन्हा या कंपन्यांचे मनमानी न तुघलकी लकी दरवाढीने शेती व्यव‌सायावर प्रचंड संकर आल्याशिवाय राहणार नाही. खरे तर दरवाढ करण्याचे कसलेही कारण नसताना ही दरवाढ शेतकऱ्यांवर लादली जात आहे.या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून खते, बियाणे ई. च्या किंमती तात्काळ नियंत्रणात आणाव्यात तसेच अप्रमाणित खते, बियाणे, औषधीची होणारी विक्री थांबवावी.पेरणीच्या काळात शेतक-यांना दर्जेदार खते, बियाणे व औषधी यांचा पूरेशा, मुबलक पुरवठा करण्याबाबत संबंधीतांना तात्काळ आरेहा यावेत. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घ्यावी.
या निवेदनावर अ‍ॅड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, विलास रोडगे, गुलाब पौळ, नारायण पवार, भारत झाल्टे, मुकुंद टेकाळे, सुभाष काकडे, एकडे, रामचंद्र कांबळे, दत्ता कोगने,भारत रवंदळे , रामचंद्र आधाव, लिंबाजी कलात, राफ भाई, लक्ष्मण प्रधान, अ‍ॅड. योगेश सुर्यवंशी, अ‍ॅड. देवराव दळवे, अ‍ॅड. रामेश्वर शेवाळे, गणेश सोळके, राजेंद्र केवारे अजित मंडलीक, आाबासाहेब भुजबळ, विकास गादेवार अक्षय कुरे, ज्ञानेश्वर लेवडे, राजेश बरसाले, पंकज सोनी,
बालासाहेब जाधव, परमेश्वर कादे, उद्धव सोळंके, सदाशिव निकम, सतिश काकडे, अ‍ॅड. उमेश काष्ट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!