आपला जिल्हा
बाराव्या दशकात महात्मा बसवेश्वरानी स्रि पुरूष समानता, बंधुता, श्रमाला प्रतिष्ठा दिली.
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त शंकरलिंग मंदिर संस्थान आयोजीत व्याख्यान प्रसंगी आशिष साडेगावकर यांचे प्रतिपादन

सेलू (प्रतिनीधी) : महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील एक महान समाजसुधारक, क्रांतिकारक संत आणि वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक होते.त्यांनी तत्कालीन कर्मठ समाजव्यवस्थेला छेद देत स्रि पुरूष समानता, बंधुता, श्रमाला प्रतिष्ठा दिली तर अंधश्रध्देला मुठमाती दिली.असे प्रतिपादन व्याख्याते आशिष साडेगावकर, कळमनुरी यांनी केले.

सेलू येथे शंकरलिंग मंदिर संस्थानच्या वतीने शनिवारी 24 एप्रिल रोजी आयोजित क्रातीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेत आशीष साडेगावकर बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी लोकमतचे पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगअप्पा बोधणे, शंकरलिंग मंदिर संस्थानचे अध्यक्ष अशोकअप्पा वाडकर यांची उपस्थिती होती.साडेगावकर पुढे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरानी प्रामाणिक श्रम,कर्म हेच मनुष्याला प्रतिष्ठा देते हा विचार रूजवीला. अनुभव मंडप जगातील पहिली संसद निर्माण करून समता,स्त्री पुरुष समानता हि बिजे समाजात रोवली.माणुसकी आणि माणुसकीचा धर्म सांगणारे बसवांचे विचार आज प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले आहेत असे सांगीतले.
प्रमुख पाहुणे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगअप्पा बोधणे म्हणाले, “श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नको.आपण स्वतः ईश्वराचे अंश आहोत हि महात्मा बसवेश्वराची शिवकण लक्षात ठेऊन भेदभाव न करता सर्व समान आहोत, हे लक्षात ठेवा. आत्मलिंग धारण करून पवित्र जीवन जगण्याची संधी मिळाली तीचा विसर पडु देऊ नका असे सांगीतले.अध्यक्षीय समारोपात लोकमत पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर यांनी सांगितले, महात्मा बसवेश्वर हे युगपुरुष होते. त्यांनी स्त्रीयाना स्वातंत्र्य, अंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन जातीभेद संपवला. शरीर हेच देवालय आहे,श्रम हाच भक्तीचा खरा मार्ग आहे असे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. सर्वांवर प्रेम हाच त्यांचा गाभा आहे असे सांगितले
प्रास्ताविक संस्थानचे सचिव प्रा. मिलिंद झमकडे, सूत्रसंचालन विरेश खडगे तर आभार सुनील तोडकर यांनी मानले. यावेळी महाप्रसाद झाला.एड.शाम राऊत, महादेव आगजाळ,विश्वनाथ हुगे ,शुभम महाजन , पवन मिटकरी सुजित मिटकरी शुभम नवघरे, बाळ वीर यश नावडे, सर्वेश नावाडे , अजय झमकडे, विजय झमकडे,उत्तरेश्वर साडेगावकर , मनमंन्थआप्पा साडेगावकर, गणेश नवघरे, पवनस्वामी कामटे, विनायकस्वामी कीर्तनकार यांनी पुढाकार घेतला.
▪️ २७ जणांनी केले रक्तदान.
व्याख्यानप्रसंगी शंकरलिंग मंदिर संस्थान व मातोश्री ब्लड बँकच्या संयुक्त रक्तदान शिबिरात विश्वनाथ हुगे यांच्या पुढाकाराने २७ जणांनी रक्तदान केले.



