सेलू (प्रतिनिधी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत सोमवार ( दि. २० ) रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील साई नाट्यगृहात प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे ( नाशिक ) यांचे ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे असतील तर पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत, अध्यक्ष सुबोध काकडे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिध्दार्थ एडके, रामराव बोबडे, डॉ. सुरेश हिवाळे, गंगाधर अवचार, गजानन साळवे, सुमेध आवटे,आबासाहेब लोंढे, मुक्तीराम वाव्हळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ . शरद ठाकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.